Anna Hazare : अण्णा हजारे यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

विशेष प्रतिनिधी

अहील्यानगर : Anna Hazare मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं हेलिपॅडवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वागत केले.Anna Hazare



आज हिवरे बाजार गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाचं लग्न आहे. या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरमध्ये आले आहेत. मंत्र्यांना खातेवाटपानंतर हा त्यांचा पहिलाच अहिल्यानगर दौरा आहे. या दौऱ्यात त्यांचं स्वागत अण्णा हजारे यांनी केलं.

अण्णा हजारे यांनी देशात काँग्रेसची सत्ता असताना जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. या आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेवर आलं. अण्णा हजारे यांनी या आंदोलनापूर्वी देखील अनेक आंदोलनं केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे ते फारसे चर्चेत नव्हते.

Anna Hazare welcomed Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या