भाजपकडून होणार हे मंत्री, सर्व समाज घटकांना आणि राज्यातील विभागांना प्रतिनिधित्व

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपकडून महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी काही प्रमुख नेत्यांची नावे निश्चित झाली आहेत. राज्यातील विविध भागांतील आणि समाजातील प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे.खालील नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे:

यामध्ये नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले पंकज भोयर, मेघना बोर्डिकर माधुरी मिसाळ यांना प्रथमच मंत्री पदाची संधी मिळत आहे. गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार, पंकजा मुंडे जयकुमार रावल मंगलप्रभात लोढा चंद्रकांत पाटील अतुल सावे या जेष्ठ मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आणि मुंबई या सर्व भागांना प्रतिनिधित्व भाजप कडून देण्यात आले आहे. ओबीसी, मराठा, महिला, आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न भाजप ने केला आहे.

Ministers from BJP will represent all social groups and departments in the state

महत्वाच्या बातम्या