Kirit Somayya : भगवे ही गेले, हिरवे ही गेले आता उरले फक्त वीस; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Kirit Somayya  महाराष्ट्रातील हिंदू जागा झाला आहे. लोकांनी त्यांचे कपडे उतरविले आहेत. भगवेही गेले, हिरवे ही गेले आहेत. आता उरले फक्त वीस आहेत ते किती दिवस टिकणार ? असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.Kirit Somayya

किरीट सोमय्या म्हणाले, देव उध्दव ठाकरे यांना सद्बुद्धी देवो. वडिलांशी बेईमानी करणारे उद्धव ठाकरे आता जमिनीवर घ्यायचा प्रयत्न करत आहेत. मशीदीचा एफएसआय वाढवण्यासाठीचे प्रयत्न उद्धव ठाकरे, अरविंद सावंत करत होते. मुस्लिम मराठी सेवा संघटनेचे सदस्यांना उद्धव ठाकरे यांनी चहा पाजला. मुस्लिम वस्त्यांमध्ये वोट जिहादचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. मुंबई महापालिकेत आता त्यांना हिंदुत्वाचा भगवा झेंडा त्यांना आठवत आहे



 

दादर हनुमान मंदिरावर बोलताना सोमय्या म्हणाले,

हा विषय कालच संपला आहे. रेल्वेने त्यांना सांगितलं आहे की हनुमान मंदिर जाणार नाही . त्यांना आता भीती वाटते आहे म्हणून त्यांना हिंदुत्वाचे गाण्याचे रेकॉर्ड सुरू करायचे आहे. रेल्वेने सांगितलं आहे की मंदिर तोडले जाणार नाही. मी चार वाजता त्या ठिकाणी मारुतीचे दर्शन घ्यायला जाणार आहे, स्टंटबाजी करायला नाही .

The saffron is gone, the green is gone, now only twenty remain; Kirit Somayya’s taunt to Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या