पुणे अंधशाळेच्या मुलींनी केले ब्रेल लिपीतून वाचन! शांतता, पुणेकर वाचत आहेत उपक्रमांत सहभाग

विशेष प्रतिनिधी

पुणे : नॅशनल बुक ट्रस्ट, आयोजित पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त सर्व पुणेकरांना शांतता! पुणेकर वाचत आहेत! या उपक्रमांतर्गत दुपारी बारा ते एक या कालावधीत पुस्तक वाचनाचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमात कोथरूड येथील पुणे अंधशाळेच्या मुली सहभागी झाल्या होत्या.

संवाद, पुणे आणि भावार्थ, ग्रंथदालनाच्या वतीने पुणे अंधशाळेत आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमात शाळेतील मुलींसोबत शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व मान्यवर सहभागी झाले होते.

सुरूवातीला हिंदवी संजय माळी आणि तनिषा हेमंत प्रजापती या दोन विद्यार्थिनिंनी तोत्तोचान हे ब्रेल लिपीतील पुस्तक वाचले. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, सुप्रसिद्ध चित्रकार, ल.म.कडू यांनी लिहिलेल्या लुई ब्रेल या चरित्राचे सामूहिक वाचन केले गेले. यामध्ये ल.म.कडू, माध्यम सल्लागार प्रसाद मिरासदार , मुख्याध्यापक वर्षा रांका, भावार्थ च्या कीर्ती जोशी, निकिता मोघे व पुणे अंधशाळेच्या शिक्षिका तसेच भावार्थ च्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी बोलताना प्रसाद मिरासदार यांनी शांतता! पुणेकर वाचत आहेत! या उपक्रमाची माहिती दिली व महत्त्व सांगितले. तर ल.म.कडू यांनी लहानपणापासून वाचन करणे कसे जरूरी आहे ते सांगितले.मुख्याध्यापक वर्षा रांका यांनी सर्व पुणेकर साजरा करत असलेल्या वाचनोत्सवात अंधशाळेतील मुलींना आवर्जून सहभागी करून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कीर्ती जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संवाद चे संचालक सुनील महाजन यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विशाखा कांबळे यांनी केले.

Pune Andhashale read from Braille! Peace, Punekars are reading participation in activities

महत्वाच्या बातम्या