Vijay Wadettiwar : जगाने ईव्हीएम नाकारले असताना आपण का स्वीकारावे, विजय वडेट्टीवार यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे म्हटले, जिथे ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात, तर जगाने ईव्हीएम नाकारले असताना आपण का स्वीकारावे, असा सवाल करत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. पुढील निवडणुका बॅलेटवर घेण्याची मागणीही केली.

वडेट्टीवार यांनी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ धोरणावर टीका केली. “जेव्हा सत्ता आणि पैसा डोक्यात जातो, तेव्हा लोकशाही संपते,” असे म्हणत त्यांनी भाजपवर लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप केला. जर भाजप पैसे आणि सत्तेच्या जोरावर सत्ता बळकावत असेल, तर जनता याला योग्य वेळी उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांनी थेट भाष्य टाळले. मात्र, भाजपकडे 137 संख्याबळ असल्याने शिंदे गट आणि अजित पवार गट दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवर अवलंबून राहावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या दोन्ही गटांची कोंडी झाल्याचे मत व्यक्त करत त्यांनी भाजपकडे वारंवार अर्ज करत सत्तेत वाटा मिळवावा लागेल, असे सांगितले.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची होणार कठोर पडताळणी

वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी गटनेत्याच्या निवडीचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला असल्याचे सांगितले. या आठवड्यात निर्णय होईल आणि नाव जाहीर होईल, असे ते म्हणाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावत, भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी काहीही तयारी नसल्याचा आरोप केला.

अदानी-फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपने ‘पुष्पा 2’ सरकार आणले असून देशाचा पुष्पा दोन कोण आहे, हे सर्वांना माहीत असल्याचा उपरोध केला.

मराठी भाषिक आणि सीमावादावर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी हा वाद जुना असल्याचे मान्य केले आणि अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी लक्ष घालून प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.

हिवाळी अधिवेशन केवळ विधेयके मंजूर करण्यापुरते मर्यादित ठरल्याचा आरोप त्यांनी केला. अधिवेशन किमान 10 दिवसांचे असावे, ही मागणी सरकारच्या कानावर पोहोचावी, असे त्यांनी सांगितले.
धर्म आणि जातिवादाच्या योजना टाळण्याचा आग्रह वडेट्टीवार यांनी संविधानाचे पालन करत कोणत्याही जाती-धर्माच्या आधारावर योजना जाहीर करू नये, असा सल्ला सरकारला दिला. नवीन सरकाराने समाजात वाद निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये, असे ते म्हणाले.

Why should we accept EVMs when the world has rejected them, asks Vijay Wadettiwar

महत्वाच्या बातम्या