विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditi Tatkare महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘लाडकी बहिण योजना’ बद्दल सध्या काही अफवांचा बाजार गाजत असा आरोप माजी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी त्यावर स्पष्ट भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, काही चुकीच्या बातम्या आणि अफवा सध्या पसरवल्या जात आहेत ज्यात त्यांचे नाव अडकवले जात आहे.Aditi Tatkare
तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “लाडकी बहिण योजना आमच्या सरकारने अत्यंत काळजीपूर्वक राबवली आहे आणि ती सुमारे 2 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त महिलांपर्यंत पोहोचली आहे.” त्याचसोबत, योजना सुरु झाल्यापासून, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी फार्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तटकरे यांनी स्पष्ट केले की, “जर काही महिलांना या योजनेसंबंधी तक्रारी आल्या, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांचे निराकरण करण्यात येईल. विरोधकांकडून या योजनेवर सुरुवातीपासून टीका करण्यात आली, आणि त्यांच्या जाहीरनाम्यात ३००० रुपयांच आश्वासन दिलं ,लाडक्या बहिणींने ते ओळखले. तीनही भावांना निवडून दिलं त्यामुळे विरोधक आता काय बोलतायत त्याला काही अर्थ नाही
Aditi Tatkare attacks those spreading rumors about Ladki Bahin Yojana
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची होणार कठोर पडताळणी
- Rahul Narvekar : राहुल नार्वेकर पुन्हा होणार विधानसभा अध्यक्ष; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज
- Markadwadi मारकडवाडीत EVMs विरोधात केला मोठा आरडाओरडा; पण जयंत पाटलांनी घेतला आमदाराच्या राजीनाम्याचा धसका!!
- CM Fadnavis : शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर, लोकसभेत मिळालेली मते दाखवली