Rahul Narvekar : राहुल नार्वेकर पुन्हा होणार विधानसभा अध्यक्ष; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपचे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यांनी अध्यक्षपदासाठी आज दुपारी अर्ज दाखल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. राहुल नार्वेकर यांना यंदा मंत्रिपदाची आस होती. परंतू त्यांचे वकिली कौशल्य पाहता त्यांची विधीमंडळात सत्ताधारी पक्षाला मोठी गरज लागणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यास सांगण्यात आले. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपद सांभाळणार आहेत. Rahul Narvekar

महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे. सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्रातील कुलाबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी शनिवारी विधानसभेत मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातही त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली होती.

Raj Thackeray : महापालिकेसाठी राज ठाकरे महायुतीत? जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू, मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत

कुलाब्यातून मोठ्या मताधिक्क्याने विजय Rahul Narvekar

कुलाब्यात ते मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यांना 81,085 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार हिरा नावजी देवासी यांना 32,504 मते पडली होती. 2019 मध्ये राहुल नार्वेकरांनी काँग्रेसचे बडे नेते भाई जगताप यांचा पराभव केला होता. राहुल नार्वेकरांना 57,420 आणि भाई जगताप यांना 41,225 मते मिळाली होती. Rahul Narvekar

वडील होते नगरसेवक

राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे कुलाब्यात नगरसेवक होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंब राजकारणाशी संबंधित आहे. भाऊ नगराध्यक्ष आहेत तर वहिनीही कफ परेडमधून भाजप नगरसेवक आहेत.

शिवसेनेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात

नार्वेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. 2014 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानसभेचे तिकीटही दिले आणि ते पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले.

Rahul Narvekar will be the Assembly Speaker again

महत्वाच्या बातम्या