विशेष प्रतिनिधी
नाशिक : Devendra Fadnavis प्रचंड झोकून देऊन काम करत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला पूर्ण बहुमत मिळवून दिले. त्यांना काही लोकांकडून टार्गेट करण्यात आले होते, अशा शब्दात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.Devendra Fadnavis
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानाचे कौतुक करत मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचे सांगितले.ते म्हणाले, जातीय समीकरण काहीही नाही. 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षनिष्ठेचा दाखला देताना भुजबळ म्हणाले, या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी फडणवीस म्हणाले मी बाहेर राहून काम करेल. मात्र पक्षाने त्यांना दिल्लीवरून सांगितले तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. तेव्हा ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी त्यांच्या कामाला पूर्णपणे
झोकून दिले. महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देण्याचं काम त्यांनी केलं
सर्व मागास वर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर कुठे गदा येऊ नये यासाठी फडणवीस यांनी सहकार्य केले आहे. मदत केली आहे. म्हणून त्यांना काही लोक प्रचंड टार्गेट करत आहेत. कारण त्यांनी ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी काम केले असेही भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले की, “फडणवीस यांनी केवळ पक्षाच्या राजकीय यशावर भर दिला नाही, तर समाजातील मागासवर्गीयांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठीही प्रभावी पाऊले उचलली आहेत.” ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी फडणवीस सतत आग्रही राहिले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महायुतीने राज्यात स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
भुजबळांनी फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेचाही समाचार घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, “ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी फडणवीस सतत आघाडीवर राहिले. त्यांचे हे कार्य काहींना खटकले आणि त्यामुळे त्यांना निशाणा बनवले जात आहे.” फडणवीस यांनी पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि अवहेलनाही सहन केली. मात्र, या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर कधीच झाला नाही.
छगन भुजबळ यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचारसरणीचा उल्लेख करत सांगितले की, “महाराष्ट्राने नेहमीच समतावादी भूमिका घेतली आहे. फडणवीसांनीही हा वारसा पुढे नेण्याचे काम केले आहे.” त्यांनी जातीभेद आणि सामाजिक अन्याय विरोधात कायम आवाज उठवला आहे.
भुजबळ यांनी ईव्हीएमवर होत असलेल्या आरोपांवर टीका करत विरोधकांना उत्तर दिले. ते म्हणाले, “EVM एक निर्जीव वस्तू आहे. तिच्यावर खापर फोडणे सोपे असते. जर काही गडबड असती, तर माझ्या मतांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती.
Devendra Fadnavis’ dedication to Mahayuti’s success: Praise from Chhagan Bhujbal
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी सोडला मुख्यमंत्री पदावरचा दावा, देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा
- D. K. Shivakumar कर्नाटकात सिद्धरामय्या यांचे स्थान बळकट, डी. के. शिवकुमार वेटिंगवरच
- शरद पवारांचे राजकीय निवृत्तीचे संकेत ठरणार खरे!
- Sharad Pawar आता मागे हटायच नाही, लढायचं, शरद पवार म्हणाले ईव्हीएम विरोधात एकत्रित लढणार