Dr. Archana Patil काहीच करायचे नाही असे मावळत्या आमदारांचे धोरण, डॉ. अर्चना पाटील यांचा अमित देशमुखांवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी 

लातुर : आपल्या महायुती सरकारने लातूरच्या शासकीय रुग्णालयासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. पण लातूरच्या लोकप्रतिनिधीनी त्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही.

गोरगरीब रुणांना कितीही त्रास झाला तरी त्यांच्यासाठी काहीच करायचे नाही, असे धोरण मावळत्या आमदारांनी राबवल्याने एकंदर परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे याठिकाणी आता सत्ता बदल आवश्यक आहे. असे लातूर शहर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितले.

लातूर शहर मतदार संघातील सर्व समस्या – अडचणींची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे, असे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी आवाहन केले.

तसेच देशाच्या सर्वांगिण विकासासाठी देशात मोदी सरकार आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार आवश्यक आहे . महायुती सरकारने माझी लाडकी बहिण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी वेगवेगळे उद्योगधंदे , रेल्वेलाईन, विमानसेवा आदी सुविधा सुरू करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराचा विचार करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लातुरातील मतदारांनी या निवडणूकीत डॉ. अर्चनाताईंना विजयी करून मतदार संघातून जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे. असे भाजप नेते अरविंद मेनन यांनीही सांगितले. तर राज्यात सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहनही केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. व्यंकटराव बेद्रे यांनीही यावेळी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Outgoing MLA Policy of Inaction, Dr. Archana Patil Attack on Amit Deshmukh

महत्वाच्या बातम्या