Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल- उद्धव ठाकरेंनी मतांसाठी लाचारी पत्करली, आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis  त्यांनी मतांकरीता लाचारी पत्करली असेल, अरे आम्ही हार पतकरू, पण लाचारी पत्करणार नाही, आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. मतांची लाचारी स्वीकारून ‘हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांना ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. मुंबईतील ओशिवरा मतदारसंघात आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना फडणवीसांनी ही टीका केली आहे. Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कोणत्या जाती धर्माच्या किंवा इतर कुणाच्याही विरोधात नाही. पण आम्ही लांगूल चालन खपवून घेणार नाही. जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन, असे आमचे म्हणणे आहे. कुणी मतांची लाचारी स्वीकारून ‘हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांना ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही, एवढेच नाही तर, आम्ही हार पतकरू, पण लाचारी पत्करणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. Devendra Fadnavis

फडणवीसांकडून पुन्हा व्होट जिहादचा उल्लेख

या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा पुनरूच्चार केला. जर ते व्होट जिहादचा नारा देत असतील, तर आम्हाला व्होटांचे धर्मयुद्ध करता येते, असे फडणवीस म्हणाले. व्होटांचे धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये विजय देखील आपल्याच बाजूने आहे, असेही ते म्हणालेत.

देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म चालणार

फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, सर्वांचा विकास करू. पण, उलेमांच्या वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या, आमच्या काजींना पगार द्या, 10 टक्के मुस्लिमांना आरक्षण द्या, अशा 17 मागण्या, ज्या देश हिताच्या नाहीत. त्या मागण्यांवर जर काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. या देशात केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेला स्वधर्म चालणार आहे. आम्ही मतांचे लांगुलचालन चालू देणार नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी महाविकास आघाडीवार हल्लाबोल केला.

Devendra Fadnavis statement – Uddhav Thackeray lost for votes

महत्वाच्या बातम्या

Trump’s : विजयानंतर ट्रम्प यांचा पुतीन यांच्याशी पहिला संवाद, युक्रेनमधील युद्ध न वाढवण्याचे आवाहन

Jaishankar : जयशंकर म्हणाले- ट्रम्प यांच्या विजयामुळे भारत चिंतित नाही, ओबामा-बायडेन आणि डोनाल्ड यांच्याशी मोदींचे वैयक्तिक संबंध

Kerala Governor : केरळचे राज्यपाल म्हणाले- ‘बटोगे तो कटोगे’ मध्ये काही चुकीचे नाही, जेव्हा आस्था समान असते तेव्हा आपण सर्वांनी एकत्र यायला हवे

Sanjeev Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे 51वे सरन्यायाधीश बनले, सहा महिन्यांच्या कार्यकाळात 5 मोठ्या खटल्यांची सुनावणी होणार