Devendra Fadnavis मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील नवी आशा

विशेष प्रतिनिधी

राजकीय गदारोळात आणि जातीय ध्रुवीकरणात विकासाचे प्रश्न मागे पडू द्यायचे नाहीत ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासनिती आहे. मराठवाडा दौऱ्यात दुष्काळावर फडणवीस यांनी मांडलेल्या उपायोजनेमुळे मराठवाड्यातील जनतेच्या मनात नवीन आशा निर्माण झाली आहे. Devendra Fadnavis Brings New Hope to the Region

नांदेडच्या किनवटमध्ये सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाष्य केले. ते म्हणाले, वर्षानुवर्षे मराठवाड्यात पाणी प्रश्न सतावतो आहे, यावर उपाय काय?, ते फडणवीसांनी सांगितलं आहे. गोदावरीच्या खोऱ्यात 54 टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटेल.

उच्च पातळी बंधार्‍यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. निम्न पैनगंगा धरण केलं तर 95 गाव बुडणार आहेत. म्हणून तो निर्णय मी बदला आहे. या 95 गावाला मी विस्थापित होऊ देणार नाही. मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून नोंद झाले आहे. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ भाऊ देणार नाही. 54 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आलं तर पाणी प्रश्न मिटेल ते काम आम्ही सुरू केलं आहे. मोदींनी सांगितलं आहे देवेंद्र, एकनाथ शिंदेजी चिंता करू नका. लागेल तो पैसा देऊ. मराठवाड्यात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे.


Thackeray MP ठाकरेंचा खासदार महिला उमेदवाराला म्हणाला ‘ माल’


फडणवीस म्हणाले, पहिल्या 2.5 वर्षात एक रुपयाचाही निधी महाविकास आघाडी सरकारने दिला नाही. आपले सरकार आल्यानंतर हजारो कोटी रुपयांचं काम झाले.आता चिंता करायचं काम नाही सरकार आपलेच येणार आहे. आता पाच वर्षासाठी सरकार आल्यानंतर किनवट मतदार संघातील एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

पुढच्या 5 वर्षात 25 लाख तरुणांना रोजगार देण्याच काम आपण करणार आहोत. लेक लाडकी योजना आणली, मुलीच्या जन्माचे स्वागत झालं पाहिजे अशा प्रकारची योजना आहे. अर्ध्या तिकिटात महिलांसाठी प्रवास सुरू केल्याने घाट्यात असलेली एसटी नफ्यात आली आहे. एवढा मोठ्या प्रमाणात महिलांनी एसटीने प्रवास सुरू केला आहे. मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत. ते मामा तिला शिकवतील, मुलींसाठी शिक्षण मोफत केलं, असे फडणवीस म्हणाले. .

जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तेव्हा विरोधक बोलत होते त्याच्या नाकावर टिचून योजना आणली. सावत्र भाऊ कोर्टात गेले पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. महाविकास आघाडीचे लोक निवडून आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार.पवार साहेब, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे तेच म्हणत आहेत. पण ही योजना सुरु राहील, असे ठाम आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते .किनवट मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भिमराव केराम विरुद्ध प्रदीप नाईक अशी लढत होणार आहे.

Devendra Fadnavis Brings New Hope to the Region

महत्वाच्या बातम्या