कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीचा सेल्फ गोल, जिल्ह्यातील दहाही जागा गेल्या, धनंजय महाडिक यांची टीका

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातून गेले असल्याची घणाघाती टीका भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केली. Maha Vikas Aghadi in Kolhapur North

महाडिक यांनी शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यामध्ये झालेल्या कोल्हापूर उत्तरमधील दोन दिवसांच्या मतभेदांवरून जोरदार टीका केली. महाडिक बोलताना म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमुळे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विरुद्ध शून्य असा स्कोअर झाला आहे, त्यामुळेच सतेज पाटील अशी वक्तव्य करत आहेत.

दरम्यान, महायुतीच्या प्रचार शुभारंभ संदर्भात बोलताना धनंजय महाडिक यांनी सांगितले की महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ काल अंबाबाईच्या दर्शनाने कोल्हापूरमध्ये झाला. तिन्ही प्रमुख नेत्यांची भाषणे कार्यकर्त्यांना उत्साह देणारी होती.

कोल्हापूर उत्तर मधून महाविकास आघाडीने सेल्फ गोलची सुरुवात केल्याची टीका सुद्धा धनंजय महाडिक यांनी केली. दरम्यान कोल्हापूर उत्तरच्या वादावरती बोलताना महाडिक म्हणाले की, कोल्हापूर उत्तरचं आता उत्तर मिळालं आहे. कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांनी छत्रपती घराण्यातील महिलांना केलेली दमबाजी सर्वांनी पाहिली.

हेच कृत्य भाजप किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालं असतं, तर त्यांनी किती कांगावा केला असता, असे त्यांनी यावेळी सांगितले. मोर्चे काढले असते, कोल्हापूर बंदची हाक दिली असती. आम्ही आता याचं राजकारण करणार नाही. मात्र आता छत्रपती घराण्याचा अवमान झाला नाही का? आता कोल्हापुरातील शाहू प्रेमी गप्प का ?

Maha Vikas Aghadi in Kolhapur North

महत्वाच्या बातम्या