Chhagan Bhujbal छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला हा सल्ला!

विशेष प्रतिनिधी

मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून एकेकाळचे सहकारी नजीब मुल्ला यांनी आव्हान दिल्याने माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत. अशातच त्यांचे जुने सहकारी छगन भुजबळ यांनी त्यांना सल्ला दिला आहे.

आव्हाड यांचे कान चांगलेच टाेचले आहेत. छगन भुजबळ म्हणाले, मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचे आहे तुम्ही अनेक वेळा चुकीची विधानं केल्यामुळे अडचणीत आलेले आहात.माझा त्यांना सल्ला असेल की शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजे, कुणाला काय बोलतो याचा विचार केला पाहिजेआव्हाड यांना राजकीय जीवनात पुढे आणण्यासाठी जसे शरद पवारांचे हात आहे तसे छगन भुजबळ यांचे देखील आहेत,  त्यांना हे माहिती आहे, असा टाेलाही भुजबळ यांनी लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीतील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांचा बाेलताना ताेल सुटताे. वादग्रस्त विधाने करण्याची त्यांना सवय आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Chhagan Bhujbal Gives This Advice to Jitendra Awhad

महत्वाच्या बातम्या