उबाठा हिंदू सण विरोधी, ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? संदीप देशपांडे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात आयोजित केलेल्या दिपोत्सवावरुन राजकारण तापू लागलं आहे. दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून उबाठा हिंदू सण विरोधी आहे. ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? असा सवाल केला आहे. UBT Oppose Hindu Festivals opposite

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाच आयोजन केलं आहे. नेत्रदीपक, भव्य अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीला मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाच आयोजन केलं जातं. आता विधानसभा निवडणुका असल्याने उद्धव ठाकरे गटाने या दिपोत्सवावर आक्षेप घेतला आहे.

मनसेच्या दिपोत्सवाविरोधात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

यावर वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवत असलेल्या संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मूळात उबाठाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदच लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर उबाठाने विरोध केला असता का?

भेडींबाजारमध्ये जाऊन ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? हिरवे कंदिल लागले असते, तर विरोध केला असता का? ईदमध्ये डीजे लावतात त्यांना विरोध करता का? मग हिंदू सणांना विरोध का? उबाठाची भूमिका हिंदू सण विरोधी आहे.

UBT Oppose Hindu Festivals opposite

महत्वाच्या बातम्या