Chandrakant Dada : कोथरुडमध्ये चंद्रकांतदादा विरुध्द शिवसेनेचे चंद्रकांत माेकाटे, चिंचवडमध्ये कलाटे, भाेसरीत लढणार गव्हाणे

विशेष प्रतिनिधी

पुणे : काेथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखाेर माजी नगरसेवक अमाेल बालवडकर यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी नाकारली आहे. निष्ठावंत माजी आमदार चंद्रकांत माेकाटे यांच्यावरच विश्वास ठेवत पक्षाने उमेदवारी बहाल केली आहे.

चिंचवड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विरुध्द राहूल कलाटे यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाली आहे. कलाटे यांनी गेल्या वेळी बंडखाेरी केली हाेती. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पाेटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नाना काटे यांनी अश्विनी जगताप यांच्या विराेधात निवडणूक लढविली हाेती. यावेळीही नाना काटे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक हाेते. मात्र, कलाटे यांना उमेदवारी मिळाली आहे.

भाेसरी मतदारसंघ मात्र शिवसेना ठाकरे गटाने शरद पवार गटासाठी साेडला आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे रवींद्र लांडगे इच्छुक हाेते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Chandrakant Dada vs Shiv Sena’s Chandrakant Mokate in Kothrud

महत्वाच्या बातम्या