Sunil Shelke : सुनील शेळकेंना पाडण्यासाठी शरद पवारांनी अपक्ष उमेदवारावर लावला डाव

विशेष प्रतिनिधी

Sunil Shelke गेल्या विधानसभा निवडणुकीत लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेल्या आमदार सुनील शेळके यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी महाविकास आघाडीचा उमेदवार न देता चक्क अपक्ष उमेदवारावर डाव लावला आहे. बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.Sunil Shelke

विशेष म्हणजे यापूर्वीच तालुक्यातील भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देऊन महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या उमेदवारीला जाहीर निषेध केला होता. बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला हाेता.



सुनील शेळके हे राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यांनी लाेकसभा निवडणुकीत बारामती लाेकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा जाेमाने प्रचार केला हाेता. त्याचबराेबर लाेणावळ्यातील पवार गटाच्या कार्यकर्त्यांना कथित दमबाजी केली हाेती. यावरून शरद पवारांनी माझ्या नादी लागू नकाे, मी अर्जावर सही केल्यामुळे तू आमदार झालास अशा भाषेत त्यांना दम दिला हाेता. त्याला शेळके यांनीही उत्तर दिले हाेते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शेळके यांना पराभूत करण्याचा चंग पवार गटाने बांधला आहे. त्यामुळे बापू भेगडे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्यास भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना त्यांना मदत करणे शक्य हाेणार नाही, याचा अंदाज असल्याने ही जागाच साेडून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघात शेळके विरुध्द भेगडे अशी दुरंगी लढत हाेणार आहे.

Sharad Pawar Backs Independent Candidate to Defeat Sunil Shelke

महत्वाच्या बातम्या