Ajit Pawar : घरी बोलावता , जेऊ घालता आणि अदृश्य हात तुतारीसाठी वापरता? अजित पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर जाहीर टीका

विशेष प्रतिनिधी

घरी बोलावता , जेऊ घालता आणि प्रत्यक्षात अदृश्य हात तुतारीसाठी वापरता. अशा दलबदलू नेत्यावर विश्वास कसा ठेवायचा? अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.

इंदापुरात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. आज राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापुरात आले होते. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा खरपूस समाचार घेतला. हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताना आमचा अदृश्य हात होता असे वक्तव्य केले होते. त्यावरून अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल केला.


Ashok Pawar vs Mauli Katke : अशोक पवार विरुद्ध माऊली कटके, प्रदीप कंद यांचा पत्ता कट की स्वतःहून माघार


कर्मयोगी आणि निराभमा सहकारी साखर कारखान्यांसाठी एवढे 300 कोटी रुपयांचे कर्ज आणले त्या पैशाचे काय झाले? माझ्या नेतृत्वाखालील माळेगाव कारखाना 36 रुपये प्रति त्यांनी भाव देतो. तुमचा कर्मयोगी किती भाव देतो? सूतगिरणीचे पैसे दिले नाहीत; दूधगंगा संघाचे वाटोळे कोणी केले ? अशा शब्दात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचा समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, आता ज्या विधान परिषदेच्या 12 जागा होत्या त्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी मला सांगितले की त्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचा समावेश होणार होता. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी सागर बंगल्यावर बैठक झाली, तेव्हा इंदापूरच्या उमेदवारी संदर्भात मी काही बोलणार नाही असे म्हटलो. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतील तो निर्णय मला मान्य असे ते म्हणाले. त्यावर मी देखील त्यांना असेच म्हणालो.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला आश्वासने दिली. आम्हाला घरी बोलावले. जेवू घातले आणि प्रत्यक्षात अदृश्य हात तुतारीसाठी वापरला असे तुम्ही म्हणत असाल, तर ही गोष्ट कोणत्या नैतिकेत बसते? ज्या पक्षांमध्ये आपण असतो त्या पक्षाचेही आपण काम करत नाही. अशा दलबदलू नेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा?

Ajit Pawar’s Public Criticism of Harshvardhan Patil

महत्वाच्या बातम्या