Sanjay Raut : तुटेपर्यंत खेचू नये, संजय राऊत यांचा काँग्रेसला खोचक सल्ला

विशेष प्रतिनिधी

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चॅन्नीथला मातोश्रीला येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मात्र तुटेपर्यंत खेचू नये हा जो सल्ला दिलाय हा सर्वांसाठी लागू होतो, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लगावला. शरद पवार गटाबरोबर जागांचा पेच सुटत चालला आहे. एकत्र बसून गुंता सोडवायची जी मानसिकता लागते ती इच्छा आमच्या दोघात आहे, असेही ते म्हणाले

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, काँग्रेस बरोबर बोलणी पूर्णपणे थांबली असं म्हणता येणार नाही. काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यात काही जागांचा पेच सुटत चाललेले आहेत. एकत्र बसून गुंता सोडवायची जी मानसिकता लागते ती इच्छा आमच्या दोघात आहे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक जागेवरचा तिढा आम्ही सोडवलेला आहे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेवर राऊत म्हणाले, मी व्यक्तिगत कोणाविषयी बोललो नाही, मत मांडलं नाही. एवढी सभ्यता सुसंस्कृतपणा आमच्या मध्ये आहे. आघाडी निर्माण होते त्यावेळेला जागावाटप विषयी अशा प्रकारचा अडथळा येतो. भाजप शिवसेना एकत्र होते तेव्हाही अडचण येत होत्या.

काँग्रेस पक्ष हा मोठा राजकीय पक्ष आहे. आणि आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. त्यामुळे प्रादेशिक पक्षाला त्या त्या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षाने स्थान दिलं पाहिजे ही आमची भूमिका महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यांमधील प्रादेशिक पक्षामुळेच राष्ट्रीय राजकारण सुरू आहे. यामुळेच मोदी देखील प्रधानमंत्री होऊ शकले. इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात जास्त प्रादेशिक पक्ष आहे. आमची सगळ्यांशी चर्चा झालेली आहे त्यामुळे काल काँग्रेसच्या दिल्ली हायकमांड कडून महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चॅन्नीथला यांना उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे माझी भूमिका पक्षासाठी असते, मी उद्धव ठाकरे यांच्या परवानगी शिवाय कधी काही बोलत नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणजेच आमची जागावाटप संपलेलं आहे. आमच्यात फार मतभेद उरलेली नाही. यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतात. कारण आमचा हाय कमांड मुंबईत आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली.

अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही निवडून येऊ शकतो. नवीन जागेवर आम्ही आमचे भाग्य आजमावू शकतो. यापैकी एक जागा आहे श्रीगोंदाची आहे . मात्र यावरती शरद पवार मार्ग काढतील. साजन पाचपुते आमच्या पक्षाचे उपनेते आहेत ते राजकारणाचा महत्त्वाचं नाव आहे त्याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन यावर निर्णय घेऊ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या हिरवळीवर बसलेले आहेत. आल्यानंतर त्यांच्या पॅंटीला हिरवळ लागलेली असेल. त्याची पांढऱ्या पॅंटीच्या पाठी गवत लागलेला असेल. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बाबतीत नेत्यांच्या बाबतीत त्याच्या दुजारीला हिरवळ लागलेली असते. पाच पाच सहा सहा तास उभे असतात. नंतर ग्राउंड वर बसून असतात. दिल्लीच राजकारण काय हे मला माहिती आहे . महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री व इतर नेते करत आहेत. दिल्लीच्या दरबारी नाकधूऱ्या काढण्याचं काम ते करतात

Sanjay Raut’s Sharp Advice to Congress

महत्वाच्या बातम्या