Congress in danger काँग्रेसचा खेळ बिघडविणार, इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक लढविणार

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर : नांदेड लोकसभेची जागा राखणे काँग्रेससाठी आव्हानात्मक ठरणार आहे. याचे कारण एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नांदेड मधून पोट निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमची नांदेड जिल्ह्यात चांगली ताकद असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा खेळ बिघडणार आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणूक होत आहे.

नांदेडमधून निवडणूक लढविण्याची घोषणा करताना जलील म्हणाले, एमआयएम पक्ष महाराष्ट्र मध्ये आला होता तेव्हा सगळ्यात जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. विधानसभेच्या इलेक्शन मी लढलो होतो. आमचे खूप चांगले नेटवर्क आहे, खूप चांगले पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत नांदेडमध्ये विद्यमान खासदारांच्या निधनानंतर आता एक पोटनिवडणूक होत आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की मी तिथून लढावे

जरीन म्हणाले, महाराष्ट्र मध्ये मी एकटा मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी सगळ्यांनी कष्ट केले होतं. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये चीड आहे

पक्षश्रेष्ठींनी निर्णय आमच्यावर सोडलेला आहे. त्याची चाचपणी करा. तिथे आपल्याला एक चांगली संधी आहे तर का आपण त्या ठिकाणाहून निवडणूक लढवू नये. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहेपार्टीमध्ये या निर्णयाने जल्लोष आहे . ज्या शहरांमध्ये एमआयएम पक्ष मोठा झाला होता त्या ठिकाणी एक चांगली संधी आली आहे
पक्षाचे अध्यक्ष ओवैसी याचा निर्णय घेतील ते म्हणाले लोकसभा निवडणूक लढवा तर आम्ही ती लढवू विधानसभा लढवा तर आम्ही लढू. सर्व निर्णय ते घेतील

Congress in danger, Imtiaz Jalil will contacts Nanded loksabha Byelection

महत्वाच्या बातम्या