आयाराम – गयाराम सगळीकडेच, पण आम्ही टार्गेट, धनंजय मुंडे यांची खंत

विशेष प्रतिनिधी

पुणे: निवडणूक आल्यावर आयाराम गयाराम होते. पण सगळ्यांना फक्त आमचाच पक्ष टार्गेट करायला दिसतो अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. In election time Aayaram Gayaram is common but why only NCP target

पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले, निवडणूक आल्यावर आयाराम गयाराम अस्ं होते. सगळ्यांना फक्त आमचाच पक्ष टार्गेट करायला मिळतो . पण आमच्याकडे कोण कोण आलय हे तुम्हाला दिसत नाही. विद्यमान आमदार सुद्धा आमच्याकडे आहेत,

महाविकास आघाडीत, महायुतीत तीन तीन पक्षांची युती असते. तेव्हा कुठला मतदार संघ कोणाला सोडला जाईल माहित नसते. त्यामुळे नाराजी असते. प्रत्येकाची आमदार होण्याची महत्वकांक्षा असते त्यावेळेस तो दुसरा पक्ष सोडायचा ठरवू शकतो .

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी काल विधान परिषदेवर संधी मिळाली नसल्यामुळे नाराज होऊन पदाधिकाऱ्यांचं सामूहिक राजीनामा दिला होता. यावर मुंडे म्हणाले, दिपक भाऊ नाराज वाटत नाही. याबाबत पक्ष नेतृत्व त्यांची नाराजी दुर करेल

जयंत पाटीलयांना मुख्यमंत्री बनवायला उद्धव ठाकरे , राहुल गांधी यांची सहमती आहे का ते त्यांना विचारलं पाहिजे, असा टोला मुंडे यांनी लगावला.

In election time Aayaram Gayaram is common but why only NCP target

महत्वाच्या बातम्या