Sanjay Raut : निवडणुकीपूर्वीच प्रत्येक मतदारसंघात दहा ते पंधरा कोटी रुपयांचे वाटप, संजय राऊत यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील काही सत्ताधारी पक्षांनी आपापल्या उमेदवारांना पुर्णपणे पैशाचं वाटप काल केलेलं आहे. काल रात्रीपर्यंत. साधारण प्रत्येक मतदार संघात उमेदवाराकडे दहा ते पंधरा कोटी रुपये पोहचल्याची माहिती असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut suspected of bias even before the announcement

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सत्ताधारी पक्ष आपापल्या उमेदवारांना पुर्णपणे पैशाचं वाटप काल केलेलं आहे. काल रात्रीपर्यंत. साधारण प्रत्येक मतदार संघात उमेदवाराकडे दहा ते पंधरा कोटी रुपये पोहचल्याची माहिती आहे. कारण आज निवडणूकांची घोषणा होईल आणि आचार संहिता लागेल याची पक्की खबर आधी सत्ताधाऱ्यांना असते. त्यामुळे पैशाचं वाटप पहिला हप्ता दहा ते पंधरा कोटी हे काल रात्री पर्यंत महाराष्ट्रातल्या बहुतेक प्रत्येक मतदार संघामध्ये वाटप झालेलं आहे ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत आहे. काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे किंबहुना हे सगळ वाटप झाल्यानंतरच निवडणूकांची घोषणा होते की काय अशी शंका आहे

khadakwasla : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा गनिमी काव्याचा प्रयत्न

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यातील निवडणूका घ्याव्यात. दबावा खाली निवडणूका घेऊ नयेत. जे विरोधक आहेत त्यांना विनाकारण छळू नये, त्रास देऊ नये. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात पैशाचा यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने जागरूक राहायला हवं ही आमची माफक अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसापासून पाहतोय निवडणूक आयोगाच्या तारखा जाहीर होतील आणि आचार संहिता लागेल. पत्र लिहुन फायदा झाला असता तर गेल्या काही वर्षामध्ये अनेक विषयांवर आम्ही पत्र लिहिली, मुंबईमध्ये आमचे अमोल किर्तीकर यांचा पराभव ज्या पद्धतीने घडविला, त्यावेळी निवडणूक आयोगाने काय केलं? निवडणूक अधिकाऱ्यांनीच हा पराभव घडवून आणला, जी मदत केली सत्ताधाऱ्यांना आम्ही अनेक पत्र दिले, पुरावे दिले मुख्यमंत्री कसे पैसे पुरवताहेत यांचे फुटेज दिले.

विधानसभा जागा वाटपावर राऊत म्हणाले, निवडणूका जाहीर होऊ द्या. २०० पेक्षा जास्त जागांवर आमचं एकमत झालेलं आहे . महाष्ट्रात २८८ जागा आहे. त्यामध्ये २१० जागांवर एकमत झाल्यावर बाकीच्या जागा आहेत त्याचा उद्याच्या दिवसांत निर्णय आम्ही घेवून टाकू

काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा असू शकतो. काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे. चेहरा जाहीर करणार नाही ही त्यांची भीमिका आहे, आमचा त्यांना पाठिंबा आहे.

Sanjay Raut suspected of bias even before the announcement

महत्वाच्या बातम्या